नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर महापालिका आयुक्तांचा इशारा…

कोल्हापूर - राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. तसेच राज्य सरकारने दिलेल्या नियमांनुसार, काही ठिकाणी त्या नियमांचे आणि कायद्यांचे उल्लंघन करताना कोल्हापूरमध्ये दिसून आले आहे. मास्क न

कोल्हापूर –  राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. तसेच राज्य सरकारने दिलेल्या नियमांनुसार, काही ठिकाणी त्या नियमांचे आणि कायद्यांचे उल्लंघन करताना कोल्हापूरमध्ये दिसून आले आहे. मास्क न वापरणे, हातमोजे न वापरणे सामाजिक अंतर न ठेवणे असे विक्रेते आणि माॕर्निंग वाॕकर अशा एकूण तीस जणांवर कोल्हापूर महापालिकेच्यावतीने आज कारवाई करुन १४ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. उद्यापासून कारवाईची ही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे महापालिका आयुक्त डाॕ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.   

महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी विक्रेत्यांना वारंवार मास्क आणि हातमोजे वापरण्याविषयी आवाहन केले आहे. महापालिकेच्यावतीने  विक्रेत्यांना सामाजिक अंतर ठेवण्याविषयी सांगितले आहे. याबाबत उल्लंघन करणाऱ्या  शहरातील जवाहर प्रोडक्टस या फरसाणा उत्पादकाला ५ हजाराचा दंड आज केला. असा एकूण तीस जणांना १४ हजार १०० रुपयाचा दंड ठोठावला. सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, अवधूत कुंभार, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, आरोग्य सहायक राजगोळकर, गीता लाखन आदींच्या पथकांने ही कारवाई केली.   

सर्वांनी सक्तीने मास्क वापरले पाहिजे, असे आवाहन करुन आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, भाजी विक्रेत्यांनी मास्कसह हातमोजेही वापरले पाहिजेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. विक्रेते, नागरिकांनी नियमांची गंभीर दखल घ्यावी. उद्यापासून आणखी पथके वाढवून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल,असा इशाराही आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिला आहे.