शाहूवाडी तालुक्यात घरगुती वादामुळे पतीने केला आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा खून

कोल्हापूर : सावर्डे तालुका शाहूवाडी येथील आरोग्य सेविका शैलेजा पाटील हीचा खून झाला आहे. याबाबत घरगुती वादातून पतीनेच दोरीने गळा आवळून खून केला असल्याची कबुली शैलजा पाटील यांचे पती अरविंद पाटील यांनी

कोल्हापूर : सावर्डे तालुका शाहूवाडी येथील आरोग्य सेविका शैलेजा पाटील हीचा खून झाला आहे. याबाबत घरगुती वादातून पतीनेच दोरीने गळा आवळून खून केला असल्याची कबुली शैलजा पाटील यांचे पती अरविंद पाटील यांनी दिली आहे. मुळच्या पन्हाळा तालुक्यातील माले या गावातील परंतु सध्या शाहूवाडी तालुक्यातील माण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सावर्डे उपकेंद्रात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या शैलजा पाटील यांचा पतीसोबत वाद झाला. त्यानंतर खूनाची घटना घडल्याचे समजते.