पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; ८ तासात २ आरोपी अटक

मयत तरुण शेखर आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास शेखर औंध हॉस्पिटल समोरील पार्किंगजवळ असलेल्या एका झाडाजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपींनी शेखरच्या डोक्यात लोखंडी गजाने मारून त्याचा खून केला.

पिंपरी: पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा लोखंडी गज डोक्यात मारून निर्घ्रुण खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजता पिंपरी चिंचवड़मधील औंध रुग्णालयाच्या समोर घडली. ही घटना घडल्यानंतर ८ तासाच्या आत गुन्हे शाखेच्या यूनिट ४ ने या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. दरम्यान मयत पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याचा विरुद्ध सांगवी पोलिस स्टेशन मध्ये मारामारी चा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

शेखर मनोहर चंडाले (वय २७, रा. नवी सांगवी) असे या घटनेत खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोविंद केडाशिवा वाघेला (वय ५०, रा. सर्व्हन्ट क्वार्टर, औंध हॉस्पिटल, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखे च्या यूनिट 4 च्या पोलिसांनी अक्षय अशोक नाईक (वय२३, रा. सर्व्हन्ट क्वार्टर, औंध हॉस्पिटल, नवी सांगवी), विक्रम उर्फ विक्कू श्रीकेसरीन सिंह (१८, रेल्वे क्रासिंग गेट समोर, बोपोडी, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सांगवी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

गुन्हे शाखा यूनिट ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुले यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुण शेखर आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास शेखर औंध हॉस्पिटल समोरील पार्किंगजवळ असलेल्या एका झाडाजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपींनी शेखरच्या डोक्यात लोखंडी गजाने मारून त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.

सांगवी पोलिसांबरोबर यूनिट ४ ची टीम ही या घटनेतील आरोपींचा शोध घेत होते. आरोपी मोबाइल बंद करून पळून गेले होते, त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात खूप अडचणी येत होत्या. दरम्यान ते बोपोडी येथे लपुन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून वरील दोघा आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की मयत शेखर उर्फ बबलू चँदाले हा पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याचा विरुद्ध सांगवी पोलिस स्टेशन मध्ये मारामारी चा गुन्हा दाखल आहे. दरम्यान सांगवी पोलिस तपास करीत आहे.