नांदेडमध्ये ४० पथकांद्वारे कोरोना सर्वेक्षण सुरु

नांदेड: नांदेड शहरात पीरबु-हान परिसरात जिल्ह्यातील पहिला रुग्ण कोरोनाबाधित आढळल्यानंतर या रुग्णाच्या निकटसहवासितांचा कसून तपास घेण्यात आला असून या रुग्णाचे ८० संपर्कातील लोकांची प्रयोगशाळा चाचण्या

नांदेड: नांदेड शहरात पीरबु-हान परिसरात जिल्ह्यातील पहिला रुग्ण कोरोनाबाधित आढळल्यानंतर या रुग्णाच्या निकटसहवासितांचा कसून तपास घेण्यात आला असून या रुग्णाचे ८० संपर्कातील लोकांची प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या असून हे सर्वजण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत. या परिसरात १३ हजार लोकसंख्येचे ४० सर्वेक्षण पथकांद्वारे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. दरम्यान आज शहरात गुरुद्वारा परिसरात आणखी एका बाधित रुग्णाची नोंद झाली आहे.