ट्विटरवर अंकुश आणणे म्हणजे लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेणे – नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर व्यक्त केली नाराजी

ट्विटरवर(Twitter) कुणाचा अंकुश नव्हता परंतु आता केंद्र सरकार थेट ट्विटरवर अंकुश ठेवणार असून याबाबत नवाब मलिक(Nawab Malik) यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई: केंद्र सरकारच्या माध्यमातून ट्विटरवर(Central Government Control Over Twitter) अंकुश आणण्याचे काम सुरू झाले असून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय हे योग्य नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे(Rashtrawadi Congress) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केली आहे.

    ट्विटर हे असे माध्यम होते ज्यावर लोकं निर्भिडपणे आपली बाजू मांडत होते. सत्य परिस्थिती लोकांसमोर आणत होते. मात्र ज्या पद्धतीने देशभरात इतर माध्यमांवर अंकुश ठेवण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. त्याच पद्धतीने ट्विटरवर अंकुश ठेवला जाणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

    ट्विटर हे एकच माध्यम राहिले होते जिथे लोकं स्वतःची निर्भीडपणे बाजू मांडत होते. एखादा व्यक्ती चुकीची माहिती टाकत असेल किंवा खोटी अफवा पसरवत असेल तर आयटी सेलच्या विविध कलमान्वये त्यांच्यावर कारवाई होत होती, असेही नवाब मलिक म्हणाले.

    ट्विटरवर कुणाचा अंकुश नव्हता परंतु आता केंद्र सरकार थेट ट्विटरवर अंकुश ठेवणार असून याबाबत नवाब मलिक यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.