नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे रास्ता रोको आंदोलन

आंदोलनामध्ये बहुसंख्येने  लोकांनी उपस्थीती दर्शवली होती त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणून या आंदोलनाकडे पाहिले गेले आहे. हा रस्ता रोको आंदोलन नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर...

    नांदेड.  पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, महागाई (Inflation), जन सामान्यांचे प्रश्न घेऊन आणि राष्ट्रीय महामार्गाच्या संथ गती कामाच्या विरोधात तसेच केंद्रात असलेल्या भाजप सरकारच्या जन विरोधी धोरणांच्या विरोधात राष्ट्रवादी  काँग्रेसचे (NCP) माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेआहे.

    आंदोलनामध्ये बहुसंख्येने  लोकांनी उपस्थीती दर्शवली होती त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणून या आंदोलनाकडे पाहिले गेले आहे. हा रस्ता रोको आंदोलन नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दीड तास सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

    जर केंद्र सरकारने महागाई पेट्रोल डिझेल दरवाढ याच्यावर कुठलाही निर्णय नाही घेतला तर यापुढे याच्यापेक्षा ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते दिनकर दहिफळे यांनी दिला आहे.