‘शपथविधीनंतर स्वत:चे आमदार टिकवता आले नाही आणि हे आमदारांना परत निवडून आणणार?’ – निलेश राणेंचा अजित पवारांना टोला

निलेश राणे(nilesh rane) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपामध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. ज्यांना शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही. ते आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करत आहेत”.

भाजपाच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल असं भाकित केलं होते. तसेच, भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसची काही नेतेमंडळी वर्षभर करताना दिसत आहेत. त्यातच अजित पवार यांनीदेखील याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून भाजपा नेते निलेश राणे(nilesh rane) यांनी अजित पवारांना(ajit pawar) टोला लगावला आहे.


निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपामध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. ज्यांना शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही. ते आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करत आहेत”.

भाजपाचे जे आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील, त्यांना पोटनिवडणुकीत जिंकवण्यासाठी तीन पक्ष मिळून एकच उमेदवार देऊ आणि भाजपाचा पराभव करू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली होती की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा सांगतात की भाजपाचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सरकारला आता सत्तेवर येऊन १२ महिने झाले. तुम्ही अद्याप भाजपाचा एकही आमदार फोडू शकला नाहीत. तुमच्यात जर ताकद असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही.