असा असेल निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील प्रवास

निसर्ग चक्रीवादळ ३ जून पासून ६ जून पर्यत भारतातल्या विविध भागात असण्याचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ ६ जूननंतर ते नेपाळमध्ये प्रवेश करेल . हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ०३ जुन

 निसर्ग चक्रीवादळ ३  जून पासून ६ जून पर्यत भारतातल्या विविध भागात असण्याचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ ६ जूननंतर ते नेपाळमध्ये प्रवेश करेल .

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ०३  जुन ते ४ जूनपर्यंत निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात घोंघावणार आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी २ जून पासून  वादळी वाऱ्यासह  मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.महाराष्ट्रातून या चक्रीवादळाची वेळ, तीव्रता आणि दिशेनुसार खालील मार्गक्रमण  करण्याची शक्यता आहे 

(खाली दिलेल्या वेळेला चक्रीवादळाचा केंद्रबिंदू त्या त्या गावाजवळून मार्गक्रमण करू शकते. )

– ३ जून दुपारी ४ मुंबई अलिबाग किनारपट्टी वरून वरळी  मार्गे 

– ३ जून रात्री ८ ठाणे पाचवड वरून भिवंडी ,उम्बरपाडा,वाडा  मार्गे 

– ४ जुन पहाटे १ खोडाला, इगतपुरी वरून  त्रिंबकेश्वर, हरसुल,कपराडा मार्गे 

– ४ जुन पहाटे २  वणी सापुतारा वरून  अभोणा ,कळवण ,सटाणा ,नामपूर मार्गे 

– ४ जुन  पहाटे ४  साक्री म्हसदी वरून लामकानी,चिमठाणे  मार्गे 

– ४ जुन  सकाळी ८  वर्शी ,थाळनेर वरून लामकानी,चिमठाणे  मार्गे 

– ४ जुन  सकाळी ९  शिंदखेडा,जैतपूर वरून शिरपूर ,सुळे  मार्गे 

– ४ जून सकाळी १० खरगोण (मध्य प्रदेश)

आपले गाव वरील ठिकाणांपासून १५० ते २०० किमी च्या आत असल्यास आपल्याकडेही  ०३  जूनच्या पहाटेपासून  ६ जूनच्या सायंकाळपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात सुरक्षित ठिकाणी राहून आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्या.