nitesh rane

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर नितेश राणे(Nitesh Rane) यांनी ‘यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा’, असा टोला हाणला आहे. 

    मुंबई: तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यानं नुकसान झालेल्या कोकणातल्या काही भागांना(Kokan Visit) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thakre) यांनी आज भेट दिली. त्यावेळी त्यांनी चिवळा बीच आणि मालवणच्या नुकसानाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. याआधी मुख्यमंत्र्यांच्या हा दौरा केवळ फोटोसेशनसाठी असेल, असं नितेश राणे(Nitesh Rane) म्हणाले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर नितेश राणे यांनी ‘यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा’, असा टोला हाणला आहे.

    मुख्यमंत्र्यांच्या एकदिवसीय पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “यालाच म्हणतात “lipstick” दौरा. मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही. मोजून 10 km आतच. विमानतळावरचा आढावा. दौरा संपला!!! ईथे.. फडणवीसजींचा 700kms चा झंझावात.. कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना!!’” अशा शब्दांत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

    मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका केल्यानंतर आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नितेश राणे यांनी कौतुक केले आहे. ‘आमचा नेता पॉवरफुल्ल’ असं नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले आहे. काही फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.