आता सांगा काय करायचं ? आधी परीक्षेसाठी आंदोलन करणारे विद्यार्थी आता विनंती करत आहेत की, ११ एप्रिलची ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकला

मला कोरोना झाला आहे. सौम्य लक्षणे असली तरी खबरदारी म्हणून मी पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल झालो आहे. येत्या बुधवारी रुग्णालयातून सोडण्यात येईल. येत्या अकरा तारखेची परीक्षा चुकू नये म्हणून, अनेकजण दुखणे अंगावर काढत आहेत. त्यामुळे परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या महिन्यातील स्थिती वेगळी होती. आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे सरकारने परीक्षा पुढे ढकलावी, अशी विनंती एका एमपीएससी परीक्षार्थीने केली आहे

    पिंपरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारच्या सूचनेनुसार एमपीएससीने १४ मार्च २०२१ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र ही पूर्व परीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोलन केले. मात्र आता हेच विद्यार्थी ११ एप्रिलची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काहीजण दुखणे अंगावर काढत आहेत. परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत आहे.

    एमपीएससीने १४ मार्च २०२१ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णया विरोधात परिक्षार्थींनी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन केले. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपला निर्णय बदलत २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. तसेच पुढील परीक्षा नियोजित वेळेत होतील असे स्पष्ट केले. एमपीएससीची २१ मार्चची परीक्षा वेळेत झाली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येत्या ११ एप्रिलला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी करीत आहेत. त्यातच पुण्यात एमपीएससीची तयारी करीत असलेल्या वैभव शितोळे या तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्या नंतर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला आणखी जोर आला आहे.