गुटखा वाहतूक करणा-या एकाला अटक; ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

राज्यात गुटखा व पान मसाला आणि तत्सम पदार्थ विक्री, साठा, वाहतूक करण्यास प्रतिबंध आहे

 

पिंपरी: बेकायदेशीरपणे प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणा-या एकाला पिंपरी-चिंचवड(pimpri-chinchwad) पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एक ने अटक केली. त्याच्याकडून गुटखा आणि टेम्पो असा एकूण ७ लाख ९७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास मोशी जवळ करण्यात आली.

आशिष अनिल शहा (वय २४, रा. मोशी गावठाण, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक अमित आनंदराव खानविलकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी(Police) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र( Maharashtra)  राज्यात गुटखा व पान मसाला आणि तत्सम पदार्थ विक्री, साठा, वाहतूक करण्यास प्रतिबंध आहे. आरोपी आशिष शहा बोलेरो पीकअप (एम एच १२ / के पी १५९७) मधून गुटखा विक्रीसाठी जात होता. पोलिसांनी त्याला मोशी वेशीजवळ अडवून ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुटखा आणि टेम्पो असा एकूण ६ लाख ९७ हजार ८४०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ तपास करीत आहेत.