कोल्हापुरात वाढला कोरोनाचा विळखा; आणखी एकाला कोरोनाची लागण

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मुंबईवरून प्रवास करून आलेल्या ३६ वर्षीय तरुण आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.या रुग्णामूळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या १४ झाली आहे.

 कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मुंबईवरून प्रवास करून आलेल्या ३६ वर्षीय तरुण आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.या रुग्णामूळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या १४ झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि,दोन दिवसांपूर्वी छत्रपती प्रमिलाराजे  जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये संबंधित रुग्णाची तपासणी झाली.त्याला लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांचा स्वैब घेण्यात आला होता. त्या बाबतचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या कोरोना बाधित युवकावर सीपीआर कोरोना उपचार कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.संबंधित तरुण मुंबईवरून प्रवास करून आल्यामुळे त्याला मेडिकल क्वारंटाईन करण्यात आले होते.अशी माहिती सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली.