lasalgaon onion auction

कांद्याच्या भावाचे गणित हे मागणी आणि पुरवठ्यानुसार बदलत असते. गेल्या हंगामात अवकाळी पावसामुळे कांदा पिकाला फटका बसला होता. त्यामुळे कांद्याचा पुरवठा कमी होऊन कांद्याचे भाव वाढायला सुरुवात झाली होती. आता कांद्याचं नवं पीक बाजारात येत असताना कांद्याला मिळणारा दर मात्र कमी होऊ लागल्याचं चित्र आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी कांद्याच्या बियाणांबाबत फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे कांद्याचे पीकही नेहमीप्रमाणे जोमात नसल्याचे चित्र आहे. 

    दरवर्षी कांदा उत्पादक शेतकरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे संकटात सापडतात. यंदादेखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. कांद्याला मिळणार भाव घसरायला सुुरुवात झाल्यामुळे आपला उत्पादन खर्च तरी निघेल काय, असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

    कांद्याच्या भावाचे गणित हे मागणी आणि पुरवठ्यानुसार बदलत असते. गेल्या हंगामात अवकाळी पावसामुळे कांदा पिकाला फटका बसला होता. त्यामुळे कांद्याचा पुरवठा कमी होऊन कांद्याचे भाव वाढायला सुरुवात झाली होती. आता कांद्याचं नवं पीक बाजारात येत असताना कांद्याला मिळणारा दर मात्र कमी होऊ लागल्याचं चित्र आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी कांद्याच्या बियाणांबाबत फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे कांद्याचे पीकही नेहमीप्रमाणे जोमात नसल्याचे चित्र आहे.

    एकीकडं पडते भाव आणि दुसरीकडे इतर भागांच्या तुलनेत कमी प्रतिचा कांदा असं दुहेरी संकट महाराष्ट्रातील काही भागातील शेतकऱ्यांसमोर उभं राहिल्याचं चित्र आहे. गेल्या हंगामातील चढ्या भावांकडे पाहून ज्या शेतकऱ्यांनी कांदा लावला, त्यांना कांदा काढणीला आल्यावर मात्र भाव कोसळल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे आता उत्पादन खर्च तरी निघेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे.

    ज्या शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्याची क्षमता आहे, त्यांनी गेल्या हंगामात साठवून ठेवलेला कांदा दर वाढल्यानंतर बाजारपेठेत उतरवला होता. त्यामुळे त्यांना चांगलाच फायदा झाला. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे साठवण क्षमता नसल्यामुळे कांदा शेतातून काढल्यानंतर लगेच विकण्याशिवाय पर्याय नसतो. नेमके याच काळात कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे.