onion

मुंबई: मागील तीन महिन्यात कांदाने अक्षरश: रडू आणले हाेते. सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा गायब झाला हाेता. परंतु गेल्या दाेन आठवड्यापासून कांदाचे भाव काहीसे घसरले आहेत.

-सर्वसामान्यांना काहीसा दिलासा ; नवीन कांदा बाजारात दाखल

मुंबई: मागील तीन महिन्यात कांदाने अक्षरश: रडू आणले हाेते. सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा गायब झाला हाेता. परंतु गेल्या दाेन आठवड्यापासून कांदाचे भाव काहीसे घसरले आहेत. एकीकडे, लाॅकडाऊने नागरिकांची झाेप उडवली हाेती तर दुसरीकडे, कांदाचे वधारलेले भाव, ज्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले हाेते. सध्या घावूक बाजारात कांदाचे भाव घसरले असले तरीही, किरकाेळ बाजारात अजूनही अनेक ठिकाणी कांद्याच्या भावाला तेजी असल्याचे दिसून येत आहे.

मागील तीन महिन्यांपासून कांदाचा भाव चांगलाच वधारला हाेता. किरकाेळ बाजारात कांदा ७०ते ९० रुपये किलाेपर्यंत विक्री हाेत हाेता. ज्यामुळे सर्वसामान्यांनी कांद्याकडे पाठ फिरवली हाेती. जुलै पर्यंत कांद्याचे भाव स्थिर हाेते परंतु अचानक अाॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यानंतर कांद्याच्या भावाला िकरकाेळ व घावूक बाजारात चांगलीच तेजी अाली. त्यात सणासुदीचे िदवस असून सर्वसामान्यांनी कांदा खरेदी करण्यास फारशी उत्सुकता दाखविली नव्हती.

मागील काही महिन्यांपासूून वाढत असलेले लाॅकडाऊन, मुसळधार पाऊस यामुळे कांदाचे खूप नुकसान झाले हाेते, बराच कांदा हा गाेदामात सडला हाेता व सर्वसामान्यांपर्यंत पाेहचू शकला नसल्याचे घावूक बाजारातील व्यापारी सांगातात, ज्यामुळे कांदाचे भाव गगनाला िभडले हाेते. तर मागील काही िदवसांपासून बाजारात तेजी अाली असून नवीन कांदा बाजारात अाला अाहे व त्यामुळे कांदाचे घावूक बाजारात भाव अचानक घसरले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे अाहे.

दरम्यान, घावूक बाजारात कांदा ३० ते ३५ रुपये असताना, अजूनही िकरकाेळ बाजारातील कांदा ५० ते ५५ रुपये िकलाे िवक्री केला जात अाहे, काही िठकाणी कांदा ६० ते ६५ रुपये िकलाे ही िवक्री केला जात असल्याचे िदसून येत अाहे. पण येत्या काही िदवसात कांदाचे भाव घसरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत अाहे, यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून गायब झालेला कांदा येत्या काही िदवसात जेवणात नक्की िदसेल अशी शक्यता वर्तविली जात अाहे.