आमचं पण आमिर- किरण सारखंच झालंय, रस्ते वेगळे मात्र मैत्री कायम ; खासदार राऊतांनी स्पष्ट केले भाजपा आणि शिवसेनेचं नाते

“आता आमीर खान आणि किरण राव यांच पहा. रस्ते वेगळे झाले आहेत पण मित्र आहेत… तसंच आहे. आमचे मार्ग बदलले आहेत, पण मैत्री कायम आहे. राजकारणात मैत्री कायम राहील. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवणार असा नाही,” असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

    सध्या सर्वत्र अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाची बातमी चर्चेचा विषय बनला आहे. आमचे मार्ग वेगळे झाले असले तरीही आमची मैत्री कायम राहील असे अमीर आणि किरण यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. याचेच उदाहरण देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेचं नाते स्पष्ट केले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

    काय म्हणाले संजय राऊत?

    राजकारणात मार्ग बदलतात, मात्र मैत्री कायम राहते असं सागंत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले,” भाजपासोबत मतभेद आहेत,देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत शत्रुत्व नाही असं म्हटलं आहे. मतभेद नक्कीच आहेत आणि मीदेखील हेच सांगत आहे. आम्ही काय भारत पाकिस्तान नाही. भेटीगाठी होत असतात, चर्चा होती असते. पण आता आमचे राजकीय रस्ते बदलले आहेत. फडणवीसांनी हेच सांगितलं आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.