ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भाजप निवडणूक होऊ देणार नसल्याचा ठराव मंंजूर -पंकजा मुंडेंनी दिली माहिती

भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी ओबीसीच्या आरक्षणाचा(OBC Reservation) निर्णय लागत नाही तोपर्यंत निवडणुका होवू न देण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

    मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या(Bhartiya Janata Party) आज सुरु असलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ओबीसीच्या(OBC Reservation) राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर तीव्र संघर्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या पत्रात उल्लेख केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबधित प्रकरणाचीही सीबीआय चौकशी करावी, असा राजकीय ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी प्रास्ताविक भाषणात बोलताना दिले.

    तोपर्यंत निवडणुका होवू न देण्याचा ठराव
    यावेळी भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी ओबीसीच्या आरक्षणाचा(OBC Reservation) निर्णय लागत नाही तोपर्यंत निवडणुका होवू न देण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. या विषयावर भाजप तीव्र संघर्ष करेल. या सरकारला प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलण्याची सवय लागली आहे, असे सांगत मुंडे म्हणाल्या की,  इम्परिकल डाटा राज्य सरकारला देणे शक्य आहे.

    भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताविक भाषणात दोन मंत्र्यांना घरी पाठवण्यात आल्याचा उल्लेख केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर राजीनामा दिला मात्र या पत्रात उल्लेख केलेल्या अन्य प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारा ठराव भाजपने वतीने करण्यात येत आहे असल्याचे ते म्हणाले.