कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय, रेल्वेने महाराष्ट्रात येणाऱ्यांना आता RT-PCR टेस्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक

रेल्वे प्रवासाद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्याची RT-PCR चाचणी निगेटिव्ह(RTPCR test negative) असणं बंधनकारक आहे.

    मुंबई: कोरोनाचा (Corona)प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला  आहे. रेल्वे प्रवासाद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्याची RT-PCR चाचणी निगेटिव्ह(RTPCR test negative) असणं बंधनकारक आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेत चढताना, प्रवासात आणि आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यावर कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    महाराष्ट्र राज्य सरकारच्या १२ मे २०२१ च्या ब्रेक द चेनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल घ्यावा लागेल, जो महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर केलेला असेल.

    १८ एप्रिल २०२१ आणि १ मे २०२१ रोजीच्या आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या ‘संवेदनशील उत्पत्ती’ च्या ठिकाणच्या राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्र राज्यात येणार्‍या प्रत्येकाला ते लागू असणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, http://contents.irctc.co.in/en/stateWiseAdvisory.html  या संकेतस्थळावर नवे नियम उपलब्ध आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मार्गदर्शक सूचना तपासण्याचे, तसेच स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.