शेतकरी आंदोलनबाबत बेताल वक्तव्य प्रकरणी दानवेंच्या पोस्टरला जोडे मारून केला निषेध 

आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्याचे आंदोलन नाही. यांच्यामागे चायना आणि पाकिस्तानचा हात आहे. सीएएच्या नावाखाली याच देशांनी मुस्लिम समुदायाला उचकवलं होतं .त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा विचार करावा असे वक्तव्य दानवे यांनी शेतकरी आंदोलनावरती बोलताना व्यक्त केले होते.

 

भोसरी: भोसरीतेल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध केला. केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात मागील १७ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबात भाजप नेते व केन्द्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी, ‘आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्याचे आंदोलन नाही. यांच्यामागे चायना आणि पाकिस्तानचा हात आहे. सीएएच्या नावाखाली याच देशांनी मुस्लिम समुदायाला उचकवलं होतं .त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा विचार करावा असे वक्तव्य दानवे यांनी शेतकरी आंदोलनावरती बोलताना व्यक्त केले होते’.

याप्रसंगी जिल्हासंघटिका सुलभा उबाळे ,विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट ,उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके ,उपशहरप्रमुख अनिलसोमवंशी ,युवासेना जिल्हाधिकारी सुरज लांडगे ,सचिन सानप,समन्वयक अंकुश जगदाळे , दादा नरळे , सर्जेराव भोसले ,विभाग प्रमुख सतीश दिसले ,गणेश इंगवले ,सतीश मरळ शाखाप्रमुख आ इ कार्यकर्ते उपस्थित होते.