हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणारा एजंट अडकला पोलिसांच्या जाळ्यात, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी करत होता व्यवसाय

सेक्स रॅकेट (High Profile sex racket) चालवणाऱ्या एका एजंटला पुण्याच्या खंडणी विरोधी पथकानं अटक ( Sex Racket Agent arrested) केली आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला गुजरातमधील (Gujrat) सुरत(Surat) याठिकाणाहून ताब्यात घेतलं आहे.

    पुणे: राज्यात अनेक ठिकाणी हायप्रोफाईल सेक्स रॅकेट (High Profile sex racket) चालवणाऱ्या एका एजंटला पुण्याच्या खंडणी विरोधी पथकानं अटक ( Sex Racket Agent arrested) केली आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला गुजरातमधील (Gujrat) सुरत(Surat) याठिकाणाहून ताब्यात घेतलं आहे.

    हा आरोपी गेल्या चार वर्षांपासून फरार होता. पुणे शहरात सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता.

    शिवा एजंट ऊर्फ शिवा रामकुमार चौधरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो मुळचा नेपाळमधील रहिवासी आहे. तो गुजराजमधील सुरत याठिकाणी १५ दिवसांपूर्वी आपल्या मित्राला भेटायला आल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांना मिळाली होती. माहिती पक्की आहे हे समजल्यावर पोलिसांनी अटकेची योजना आखली आणि पुणे पोलिसांचं पथक गुजरातला रवाना झालं.

    पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शखाली खंडणी विरोधी पथक गुजरातमधील सुरत याठिकाणी गेले होते. येथून सुरत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीनं पुणे पोलिसांनी शिवा चौधरीला अटक केलं आहे. संबंधित आरोपीच्या टोळीनं पुण्यासह राज्यभरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवलं होतं. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.