अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर छापा; एक लाखाचा ऐवज जप्त

पिंपरीतील निराधारनगर मध्ये जुगार अड्डा चालवणा-या जुगार अड्डा चालक सुनील राजेंद्र मोरे आणि त्याचे सात साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पिंपरी: अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. त्यात पोलिसांनी एक लाख ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरीतील निराधारनगर मध्ये जुगार अड्डा चालवणा-या जुगार अड्डा चालक सुनील राजेंद्र मोरे (वय ३८, रा. निराधार नगर, पिंपरी) आणि त्याचे सात साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथे निराधार नगर झोपडपट्टी येथे अंदर-बाहर हा जुगार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी ४६ हजारांची रोख रक्कम, ५४ हजारांचे सहा मोबाईल फोन, २५ रुपयांचे पत्त्याचे कॅट असा एकूण एक लाख ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी सुनील मोरे हा जुगार अड्डा चालवत होता. त्याच्यासह जुगार खेळणा-या अन्य सात जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.