रायगडावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार – युवराज छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर: अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी ६ जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे

 कोल्हापूर: अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी ६ जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक व शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

शिवभक्तांच्या सहकार्याने २००८ ला मेघडंबरीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना  झाली.दरवर्षी शिवभक्तांचा गडावर उपस्थितीचा आलेख उंचावत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.  देशभरातूनच नव्हे तर जगभरातून शिवभक्त रायगडावरील हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी आणि त्याचा साक्षीदार होण्यासाठी आतुर झालेले असतात. यंदाही हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सोहळ्याबाबत समितीचे पदाधिकारी व शिवभक्तांनी चर्चा करून जगभर पसरलेल्या कोरोना महामारीचे संकट पाहता समाजहीत डोळ्यासमोर ठेवून सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे. सोहळा साधेपणाने साजरा होईल. यावर्षीचा शिवराज्याभिषेक घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे  पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी केले आहे.