corona

रायगड जिल्ह्यात बुधवार दि. १४ ओक्टोबर  रोजी २३३ नवीन रुग्ण  (New Patients)  आढळले. ६ जणांचा मृत्यू (death) झाला, तर ३५३ रुग्ण बरे होऊन (recovered) घरी गेले. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या (total covid cases) ५११८५  झाली असून जिल्ह्यात १४४८  जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल तालुक्यात १४२ नवीन रुग्ण आढळले   असून पनवेल महापालिका क्षेत्रात ११७  नवीन रुग्ण आढळले  आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात २ , रोहा २, तर अलिबाग आणि खालापूर येथील प्रत्येकी एका  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण मध्ये २५,  पेण ३२,  खालापूर १४,  अलिबाग १३,  कर्जत १०,  रोहा ८,  माणगाव ५,  महाड ४,  श्रीवर्धन ३,  उरण  आणि मुरुड  मध्ये एक  रुग्ण  आढळला  आहे. रायगड जिल्ह्यात १,८३,०४९ चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ५१,१८५  पॉझिटिव्ह  आल्या आहेत. २०९ चाचण्यांचे रिपोर्ट यायचे आहेत. कोरोंनावर ४६,९५५ जणांनी मात केली असून २,७८२  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात १४४८ जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.