रेल्वे बोर्डाचा प्लॅन ‘बी’ ; बुलेट ट्रेन वापी ते अहमदाबाद धावणार

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला ठाणे महापालिकेने ब्रेक लावल्याने रेल्वे बोर्डाने प्लान 'बी' तयार ठेवला असल्याची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रात जमीन मिळण्यास अडचण आलीच तर बुलेट ट्रेन अहमदाबाद ते वापी अशी पहिल्या टप्प्यात बांधण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ विनोद कुमार यादव यांनी आज स्पष्ट केले.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला ठाणे महापालिकेने ब्रेक लावल्याने रेल्वे बोर्डाने प्लान ‘बी’ तयार ठेवला असल्याची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रात जमीन मिळण्यास अडचण आलीच तर बुलेट ट्रेन अहमदाबाद ते वापी अशी पहिल्या टप्प्यात बांधण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ विनोद कुमार यादव यांनी आज स्पष्ट केले.ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल चार वेळा मंजुरीसाठी आणण्यात आलेला बुलेट ट्रेनसाठी जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव अखेर बासनात गुंडाळण्यात आला. प्रशासनाचा प्रस्ताव दप्तरी दाखल केल्याची घोषणा महापौर नरेश म्हस्के यांनी महासभेत केली.यानंतर ही ट्रेन वापी येथून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी शनिवारी दिल्लीत रेल्वेच्या कामगिरीचा आढावा घेणारी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी हि माहिती दिली.

काय म्हणाले यादव

ठाणे महापालिकेने जमीन हस्तांतरण प्रक्रिया थांबविल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र राज्य सरकारने चार महिन्यांत बुलेट ट्रेनसाठी जमिनीची हस्तांतरण प्रक्रिया ८० टक्के पूर्ण होईल असे आश्वस्त केले आहे.कोणत्याही प्रकल्पासाठी जोपर्यंत जमीन ८० टक्के प्रत्यक्षात ताब्यात येत नाही तोपर्यंत टेंडर वाटप करता येत नाही. गुजरातच्या हद्दीत सर्व टेंडर वाटप होऊन बांधकामास सुरुवातही झाली आहे. ५०८ कि.मी.चा हा प्रकल्प एकत्रच बांधण्याची खरे तर रेल्वेची इच्छा आहे. परंतु यदाकदाचित महाराष्ट्रात जमीन मिळण्यास अडचण आली तर अहमदाबाद ते वापी ३२५ कि.मी.चा पहिला टप्पा बांधून सुरू करण्यात येईल.