मुंबई आणि ठाण्यात ३१ मे आणि १ जूनला पावसाची शक्यता

मुंबई: अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या वादळामुळे मुंबईवर परिणाम होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अरबी समुद्रातील वादळामुळे २९ मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार

मुंबई: अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या वादळामुळे मुंबईवर परिणाम होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अरबी समुद्रातील वादळामुळे २९ मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम ४८ तासांपर्यंत राहणार असल्याचे हवामान विभागाने २८ मे रोजीच्या अहवालात म्हटले आहे. या सगळ्या हवामानातील बदलाच्या परिस्थितीमुळे मुंबई आणि ठाण्यात ३१ मे आणि १ जून रोजी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील काही भागांमध्येही वादळ आणि विजांचा कडकडाट जाणवू शकतो. किनारपट्टीच्या भागात या वादळाचा परिणाम जाणवेल. हवामान विभागाने अद्याप याबाबत धोका असण्याची सूचना दिली नाही. मात्र कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातच्या दक्षिण भागातील किनारपट्टीवर वादळ आणि पावसाची शक्यता आहे. मुंबईत जुनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सुन पुर्व पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.