…… तरच बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात मिळणार प्रवेश, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

राज्यात बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना यापुढे दोन डोस(Two Doses Of Vaccine) घेतले असतील तरच प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    मुंबई : देशात ४२ कोटी लसींचा पुरवठा(Vaccine Supply) होणार आहे. ऑगस्टमध्ये महाराष्ट्राला(Maharashtra) चार सव्वाचार कोटी लस मिळायला हव्यात. लोकसंख्येच्या प्रमाणात लस देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला मोठ्या प्रमाणावर लस येतील, अशी माहिती  आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यानी दिली. राज्यात बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना यापुढे दोन डोस(Two Doses Of Vaccine) घेतले असतील तरच प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    ९२ टक्के रुग्ण दहा जिल्ह्यांमध्येच
    यापूर्वी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल घेतलं जात होता. आता ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे त्याचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असे टोपे म्हणाले. ते म्हणाले की राज्यातील एकूण ९२ टक्के रुग्ण संख्या केवळ दहा जिल्ह्यातच आहेत. मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.

    निर्बंधांमध्ये शिथिलता इतक्यात नाहीच
    राज्यात बऱ्यापैकी लसीकरण झाले आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्बंधात शिथिलता दिली जाईल आणि लोकल ट्रेनही सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येतील अशी अपेक्षा होती मात्र, कॅबिनेटने निर्बंधात कोणतीही शिथिलता दिली नसल्याचे टोपे म्हणाले. राज्यात रोज ७ ते ९ हजार कोरोना रुग्ण सापडत असल्याने निर्बंधात शिथिलता इतक्यात देता येणार नसल्याचे ते म्हणाले. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी अजून एक हजार डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. आठवडाभरात त्याची जाहिरात निघेल, असे सांगतानाच आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीच्या वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत डॉक्टरांची कमतरता भासणार नाही, असे ते म्हणाले.