रूग्णालयाच्या विरोधात या मेल आयडीवर करा तक्रार , उपलब्ध बेड्सची माहितीही घ्या ऑनलाईन – राजेश टोपे

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच कोणत्या रूग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, तसेच रूग्णावर करण्यात आलेल्या उपचाराचा खर्च वाटेल त्या पध्दतीने लावला जात आहे? यासह

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच कोणत्या रूग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, तसेच रूग्णावर करण्यात आलेल्या उपचाराचा खर्च वाटेल त्या पध्दतीने लावला जात आहे? यासह रूग्णालयाची तक्रार करायची असले तर ती ऑनलाईन पध्दतीने करता येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देत लवकरच रूग्णालयातील उपलब्ध बेडची संख्याही ऑनलाईन पध्दतीने सर्वांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूना रोखण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अनेक खाजगी रूग्णालये रूग्णांना हॉस्पीटलमध्ये दाखल तर करून घेत आहेत. मात्र त्यांच्यावर केलेल्या उपचारासाठी अव्वाच्या सव्वा दरात आकारणी करत आहेत. अशा अव्वाच्या सव्वा रूग्णालयांच्या विरोधात कडक धोरण सरकारने घेतले असून रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने होणाऱ्या दर आकारणी बाबत तक्रार complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलवर नागरिकांनी पाठवावी असे आवाहन करतानाच त्यांनी करत अशा तक्रारींवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि राज्य आरोग्य सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी काळात कोरोनाबाधीत रूग्णांच्या वाढत्या संख्येचा अंदाजानुसार मुंबईसह राज्यात बेड उपलब्ध करण्यात येत आहेत. मात्र यासंदर्भातील माहिती सर्वसामान्य नागरिकांना किंवा, रूग्णवाहिका अर्थात अॅम्ब्युलन्स चालकास नसते. त्यामुळे रूग्णांना घेवून एकेठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेवून फिरावे लागते. यावर पर्यायी मार्ग काढण्यात आला असून सर्व रूग्णांतील खाटांची अर्थात बेड्सची माहिती ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीचा कॉमन डॅशबोर्ड तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून हा डॅशबोर्ड सर्व प्रमुखांकडे आणि रूग्णवाहीका चालकाकडेही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले असून त्यात साधे बेड, फक्त ऑक्सिजनची सुविधा आणि अतिदक्षता विभागातील बेड यासाठी दर निश्चित केले आहेत. या आदेशानुसार कोरोनाच्या रुग्णांसाठी दर आकारणीचे तीन स्तर ठरविण्यात आले असून दर दिवसाला जास्तीत जास्त ४०००, ७५०० व ९००० रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांनी आपल्या सेवा दिल्याच पाहिजे असे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://charity.maharashtra.gov.in/en-us/View-Hospital-Details-en-us या लिंकवर राज्यातील चॅरिटेबल रूग्णालयातील सध्याची उपलब्ध बेड संख्या माहिती करून घेता येणार आहे.