मिल्खा सिंह यांच्या निधनाने हरपला क्रीडा क्षेत्रातील कोहिनूर – रामदास आठवलेंनी वाहिली श्रद्धांजली

मिल्खा सिंह(Milkha Sing) यांच्या निधनाने भारतीय क्रीडा क्षेत्रातील कोहिनूर हरपला आहे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले(Ramdas Athavale) यांनी दिवंगत मिल्खा सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    मुंबई: महान धावपटू पद्मश्री मिल्खा सिंह यांच्या निधनाने(Milkha Sing Death) भारतीय क्रीडा क्षेत्राची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे. फ्लाईंग शीख या नावाने प्रसिद्ध असणारे मिल्खा सिंह(Milkha Sing) यांच्या निधनाने भारतीय क्रीडा क्षेत्रातील कोहिनूर हरपला आहे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले(Ramdas Athavale) यांनी दिवंगत मिल्खा सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    मिल्खा सिंह यांचे जीवन म्हणजे प्रचंड संघर्ष आहे. त्यांनी मेहनत संघर्ष करून स्वतःला घडविले. अनेक अडचणींचा मुकाबला केला.शून्यातून यशोशिखर गाठणारे ते गुणवान धावपटू होते. त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या.राष्ट्रमंडल आणि एशियन गेम्स मध्ये त्यांनी देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांचे जीवन सदैव नव्या खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे. फ्लाईंग शीख मिल्खा सिंह यांच्या निधानाने देशाने महान खेळाडू गमावला आहे अशी शोकभावना ना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.