राज्यातले सरकार जास्त काळ चालावे हीच आमची भूमिका – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले मत

मोठ्या भावाच्या नात्याने काँग्रेस, शिवसेनेला(Shivsena) सोबत घेऊन पवारसाहेबांनी(Sharad Pawar) राज्यात जे सरकार स्थापन केले ते जास्त काळ चालावे , अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

    मुंबई: राज्यात काँग्रेसी(Congress In Maharashtra) विचारांचे सरकार राहावे अशी शरद पवार साहेबांची भूमिका नेहमीच होती. त्या भूमिकेतून त्यांनी समजुतीची भूमिका घेत १९९९ मध्ये काँग्रेसला(Congress) मुख्यमंत्रीपद(Chief Minister) देवू केले होते. आजही काँग्रेसच्या तुलनेत आमचा पक्ष मोठा आहे. मात्र मोठ्या भावाच्या नात्याने काँग्रेस, शिवसेनेला(Shivsena) सोबत घेऊन पवारसाहेबांनी(Sharad Pawar) राज्यात जे सरकार स्थापन केले ते जास्त काळ चालावे , अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

    मुख्यमंत्रीपद असते तर परिस्थिती वेगळी असती
    ते म्हणाले की, सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी १९९९ साली काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यांच्या या धाडसी निर्णयात अनेक नेत्यांनी त्यांना साथ दिली. पक्ष स्थापनेनंतरची पहिली निवडणूक स्वतंत्र लढल्यानंतर दोन्ही पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले. २००४ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षाही अधिक जागा पटकावल्या. त्यावेळी सत्तावाटपाच्या फॉर्मुल्यानुसार मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले होते. मात्र, काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसने हे पद काँग्रेसला दिले होते.

    राजकीय परिस्थिती जशी असेल तशी तडजोड त्या-त्या वेळी केली जाते. त्यावेळी मुख्यमंत्रिपद आम्हाला मिळायला पाहिजे होते हे खरे आहे. पण तेव्हा वरिष्ठ नेत्यांमध्ये काही चर्चा झाली त्यानुसार हे पद काँग्रेसला दिले गेले. आता त्यावर वेगळे भाष्य करणे योग्य नाही. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रिपद घेतले असते तर आताची परिस्थिती वेगळी असती. राजकारणात वेगळे बदल दिसले असते, असेही जयंत पाटील म्हणाले.