सीजे हाऊस प्रकरण प्रफुल्ल पटेलांच्या अंगलटी येणार ?  ईडी कार्यालयात ‘या’ कारणासाठी लावली हजेरी

प्रफुल्ल पटेल(Praful Patel) यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स आणि डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीचा मुलगा असिफ यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीला(Ed) संशय आहे.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे(Rashtrawadi Congress) नेते प्रफुल्ल पटेल(Praful Patel In ED Office) आज दुपारी ईडी कार्यालयात गेले होते. पटेल यांची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याच प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल झाले. याआधी २०१९मध्ये ईडीनं प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली होती. आज पुन्हा ते ईडी कार्यालयात गेले होते.

    प्रफुल्ल पटेल यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स आणि डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीचा मुलगा असिफ यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीला असिफ मेमनच्या अकाऊंटवरुन काही कोटींचे व्यवहार प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्समध्ये झाल्याचा संशय आहे. इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा आणि मुलगा असिफ आणि जुनैदच्या यांच्या नावे सीजे हाऊस इमारतीत खरेदी केलेल्या प्रॉपर्टीच्या बदल्यात असिफनं पैसे मिलेनियम डेव्हलपर्सला दिल्याचा संशय व्यक्त होत आहे.

    ईडी कार्यालयात जाऊन आल्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, खूप दिवसांपूर्वी जी प्रॉपर्टी त्यांनी जप्त केली होती त्याच प्रॉपर्टीच्या कन्फर्मेशनसाठी त्यांना स्वाक्षरी हवी होती. त्यासाठी गेलो होतो.