जनआशिर्वाद यात्रेला ब्रेक लागला तरी भाजपची पोलखोल सुरुच ठेवणार, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

केंद्रातील भाजप सरकार(BJP Government) अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अपयशी ठरलेले आहे. सरकारचे अपयश लपवण्याकरिता वेळोवेळी काही राजकीय खेळी भाजपाकडून केली जात आहे. त्याचाच एक भाग ही जनआशिर्वाद यात्रा (Janashirwad Yatra)असल्याचे महेश तपासे(mahesh Tapase) म्हणाले.

    मुंबई: राष्ट्रवादीकडून(Rashtrawadi Congress) जनआशिर्वाद यात्रेची(Janashirwad yatra) पोलखोल सुरू असून भाजपने ही यात्रा आज रद्द केली असली तरी केंद्र सरकारच्या कामाची पोलखोल सुरुच ठेवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे(Mahesh Tapase) यांनी दिली.केंद्रातील भाजप सरकार अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अपयशी ठरलेले आहे. सरकारचे अपयश लपवण्याकरिता वेळोवेळी काही राजकीय खेळी भाजपाकडून केली जात आहे. त्याचाच एक भाग ही जनआशिर्वाद यात्रा असल्याचे महेश तपासे म्हणाले.

    सोमवारपासून राष्ट्रवादीकडून जनआशिर्वाद यात्रेचा पोलखोल कार्यक्रम सुरू करण्यात आला असून या माध्यमातून जनतेसमोर सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते करत आहेत, अशी माहितीही महेश तपासे यांनी दिली.

    महागाई आणि बेरोजगारीमुळे जनतेचे कंबरडे मोडले असून, नागरिकांना रोजगाररुपी दिलासा देण्याऐवजी जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अतिशय खालच्या पातळीवरील वैयक्तिक स्वरूपाचे राजकीय आरोप-प्रत्यारोप भाजपाचे नेते करत आहेत. आतापर्यंत ज्या – ज्या भाजपच्या मंत्र्यांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला त्या मंत्र्यांनी मोदी सरकारची एकही सफल योजना सांगितली नाही यातूनच या यात्रेच्या अपयशाची नोंद झाली असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले.