Corona Image

४२४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद

मुंबई : शुक्रवारी राज्यात १५,५९१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १४,१६,५१३ झाली आहे. आज १३, २९४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ११, १७, ७२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २,६०,८७६ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान आज ४२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ % एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ४२४ मृत्यूंपैकी २७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८७ मृत्यू सातारा-३२, नागपुर -१४, पुणे-७, नाशिक -६, ठाणे -५, सोलापुर -५, य़वतमाल -४, कोल्हापुर -३, पालघर-२, चंद्रपुर -२, सांगली -२, जळगाव -१, रत्नागिरी -१, सिंधुदुर्ग -१, वर्धा -१ आणि मध्य प्रदेश -१ असे आहेत.

तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६९,६०,२०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,१६,५१३ (२०.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २१,९४,३४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,०५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.