कोरोना रुग्ण वाढत असल्याने  कोकण आयुक्तांची भिवंडीत आढावा बैठक

भिवंडी : भिवंडी शहरात दिवसेन दिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढीस सुरवात झाली असून शहरात १० तर ग्रामीण भागात ८ असे १८ रुग्ण आढळून आल्याने कोकन विभागीय आयुक्त शिवाजीराव दौड यांनी भिवंडी

भिवंडी : भिवंडी शहरात दिवसेन दिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढीस सुरवात झाली असून शहरात १० तर ग्रामीण भागात ८ असे १८ रुग्ण  आढळून आल्याने कोकन विभागीय आयुक्त शिवाजीराव दौड यांनी भिवंडी महानगरपालिका मुख्यालयास भेट देऊन महानगरपालिका कामकाजाचा आढावा घेऊन त्यावर कशा प्रकारे उपाय योजना करण्यात येईल या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ,कोकण विभागीय उपायुक्त मनोज गोहाड उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर ,महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर ,पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे ,तहसीलदार शशिकांत गायकवाड ,गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे आदी अधिकारी उपस्थित होते .या बैठकी दरम्यान महानगरपालिका प्रशासना कडून करोना संसर्ग टाळण्या साठी केलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली असता आयुक्त शिवाजीराव दौड यांनी शहरातील आरोग्य केंद्रांची सुविधा सुधारण्या सोबतच ,आपत्ती व्यवस्थापन व ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत त्या भागातील जास्तीत जास्त नागरीकांची आरोग्य तपासणी करून सर्वेक्षण करण्या बाबत सूचना दिल्या .

भिवंडी शहरात प्रवास करून शहरात आलेल्या नागरीकांना कोरोना लागण झाली असल्याने शहरातील प्रवेशा ठिकाणाची तपासणी व नाकाबंदी अधिक कडक करण्याचे आदेश विभागीय आयुक्त यांनी बैठकीत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना दिले