rohit pawar and anil parab

आमदार रोहित पवार(rohit pawar) यांनी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्राकडे विनंती करावी, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब(anil parab) यांच्याकडे केली.

कोरोना(corona) आणि लॉकडाऊननंतर(lockdown) राज्यातील परिस्थिती हळूहहळू सुधारत आहे. मात्र राज्य सरकारने मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा(local service) अजून सर्वांसाठी सुरू केलेली नाही. हे लक्षात आल्यावर आमदार रोहित पवार(rohit pawar) यांनी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्राकडे विनंती करावी, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब(anil parab) यांच्याकडे केली.


मार्च महिन्यापासून मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. लोकल सेवा सुरू नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सगळ्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. याच मागणीसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. याबद्दल त्यांनी ट्विट करून माहिती दिली.

रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसतोय. मुंबईत एपीएमसीमध्ये गेलो असता, माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठीच लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंती परिवहनमंत्री अनिल परब साहेबांना केली.”

मंगळवार आला तरी अद्याप लोकल सेवा सर्वसामान्य लोकांसाठी कधी सुरु होणार हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. या निर्णयाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.