रोहित पवारांनी निर्मला सीतारामन यांना दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पेट्रोलच्या दराच्या शंभरीवरून लगावला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar Wishes Nirmala Sitaraman On Her Birthday) यांनी अर्थमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना रोहित पवार यांनी अर्थमंत्री आणि केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

    देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण(Nirmala Sitaraman Birthday) यांचा आज ६२ वा वाढदिवस असल्याने अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar Wishes Economic Minister) यांनीदेखील अर्थमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना रोहित पवार यांनी अर्थमंत्री आणि केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

    रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारमणजी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना.”

    काही दिवसांपूर्वीच इंधनाच्या दरांमध्ये घट होण्याची शक्यता कमी आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितले होते. उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच इंधनदरवाढीला सर्वस्वी काँग्रेसप्रणित युपीए सरकार जबाबरदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता.