एस.आर.पी.एफ. च्या आठ जवानांना कोरोनाची लागण : दौंडची कोरोनाबधितांची संख्या नऊ वर

दौंड : मुंबई येथे बंदोबस्त करून दौंड येथे परतलेल्या राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातमधील ८ जवानांचा खाजगी वैद्यकीय अहवाल कोरोनाबाधित आला असल्याने दौंड तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या नऊ वर

दौंड  : मुंबई येथे बंदोबस्त करून दौंड येथे परतलेल्या राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातमधील ८ जवानांचा खाजगी वैद्यकीय अहवाल कोरोनाबाधित आला असल्याने दौंड तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या नऊ वर गेली आहे, 

     राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली एस. खान यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथून १६ मार्च रोजी बंदोबस्त करून दौंड येथे परतलेल्या तुकडीतील ११० जवानांना गटाचे समादेशक श्रीकांत पाठक यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांच्या घरी न पाठविता एसआरपीएफ कॅंपमधील अष्टविनायक मंगल कार्यालयात क्वारंटाइन केले होते. दररोज त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात होती. परंतु, राज्य राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालिका अर्चना त्यागी यांच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांची मुंबई येथील एका खासगी वैद्यकीय संस्थेकडून स्वॅब टेस्ट करण्यासाठी नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. सदर खासगी संस्थेचा अहवाल गुरुवार (ता.३०) रोजी प्राप्त झाला असून, त्यानुसार जवान २७ ते ३५ या वयोगटातील आठ जवानांना कोरोनाबाधित आहेत, दरम्यान, खबरदारी म्हणून प्रशासनाने संबंधित परिसर सील करण्यात आला आहे,