पुण्यातील आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या

पुण्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले विद्यापीठाने आज होणाऱ्या परीक्षांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

पुण्यात (Pune) झालेल्या जोरदार पावसाच्या (Heavy rains) पार्श्वभूमीवर सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) आज (गुरुवारी) होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा (Postpone) निर्णय घेतला आहे. ऑनलाईन(Online) आणि ऑफलाईन (Offline) अशा दोन्ही परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज रद्द झालेल्या परीक्षा कधी होणार, याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. विशेषतः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना पुरामुळे प्रवास करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. तसेच पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. इंटरनेट सेवेतही व्यत्यय येत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन परीक्षा देणेदेखील अवघड असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.