उद्यापासून शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या भागाचा घेणार आढावा

गेल्या काही दिवसांपासून मुंबई (Mumbai) , ठाणे (Thane) आणि पुणे (Pune) जिल्ह्यासह राज्यातील काही भागांत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे कोकण (Konkan) , मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि मराठवाडय़ात (Marathwada) पावसामुळे पिकांचं मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा (Farmers) अडचणीत सापडला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.

शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर असणार आहेत. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार भेट देणार असून पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

राज्यभरात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.