शार्प शूटर धवलसिंह मोहिते-पाटलांनी उडवले ‘त्या’ नरभक्षक बिबट्याचे मस्तक ; १५ फुटांवरून झाडल्या ३ गोळ्या

सोलापूर : बारा बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागाने सहा शार्प शूटरची नियुक्ती केली होती. परंतु त्यांनाही गुंगारा देत बिबट्याचा वार सुरूच होता.त्यातच दोन दिवसांपासून गायब झालेला व कोणाच्याही दृष्टिक्षेपास न पडलेला नरभक्षक बिबट्या शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करमाळा तालुक्यातील वांगी या गावाच्या शिवारात शिकारीच्या शोधात ऊसातून बाहेर पडला.

सोलापूर : बारा बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागाने सहा शार्प शूटरची नियुक्ती केली होती. परंतु त्यांनाही गुंगारा देत बिबट्याचा वार सुरूच होता.त्यातच दोन दिवसांपासून गायब झालेला व कोणाच्याही दृष्टिक्षेपास न पडलेला नरभक्षक बिबट्या शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करमाळा तालुक्यातील वांगी या गावाच्या शिवारात शिकारीच्या शोधात ऊसातून बाहेर पडला. दरम्यान अकलूज येथील नेमबाजीत तरबेज असलेल्या धवलसिंह मोहिते पाटील यांना बिबट्याला मारण्यासाठी वन विभागाने परवानगी दिली होती. त्यानुसार धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या बंदुकीच्या गोळ्यांनी नरभक्षक बिबट्याचा खात्मा केला आहे.

केळीच्या बागेत आलेल्या बिबट्याला शार्प शुटर डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी बिबट्याला १५ फुटावरून आपल्या १२ बोअरच्या रायफलमधून सलग ३ गोळ्या घातल्या आणि बिबट्याचा  खात्मा केला आहे. बिबट्या ठार झाल्याचे समजताच करमाळा तालुक्यातील नागरिकांनी जल्लोष करत सुटकेचा निश्वास सोडला आहे.

१२ जणांचा घेतला बळी
नरभक्षक बिबट्याने ३ डिसेंबर रोजी करमाळा तालुक्यातील रायगांव येथे ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेले कल्याण फुंदे यांना ठार केले. तर ५ डिसेंबर रोजी करमाळ्यात अंजनडोह येथील जयश्री शिंदे या लिंबोणीच्या बागेत लिंब गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करत त्यांनासुद्धा ठार केले होते. त्यानंतर याच तालुक्यातील चिखलठाण येथे ऊसतोडणी मजुराच्या आठ वर्षीय फुलाबाई हरिचंद हिच्यावर हल्ला करत तिला ठार केले होते. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी करमाळा तालुक्यातील भिवरवाडी येथे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अनिल अरकिले यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाय व वासरावर हल्ला केला होता. ज्यामध्ये वासराचा मृत्यू झाला होता तर मानेवर व गळ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने गे बेशुद्ध पडली होती. करमाळा तालुक्यातील तिघांचा बळी बिबट्याने घेतला होता तर सोलापूरसह बीड, आणि औरंगाबाद येथे जवळपास १२ जणांचा बळी घेऊन दहशत निर्माण केली होती.

कोण आहेत धवलसिंह मोहिते पाटील
बिबट्याचा खात्मा करण्यासाठी शार्प शुटर असलेले अकलूजच्या डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचीच रायफल कामाला आली. बारामतीचे शार्प शुटर तावरे यांच्यासमवेत धवलसिंह आणि अन्य दोघे असे चौघेजण बिबट्याच्या मागावर असतानाच बिबट्या दिसताच चोहोबाजूंनी  गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला. बिबट्याने धवलसिंहांच्या दिशेने झेपघेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अगदी जवळून म्हणजेच १५ फुटांच्या अंतरावरून बिबट्याला लक्ष्य करत ३ गोळ्या झाडल्या आणि बिबट्याला ठार केले. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते- पाटील यांचे चिरंजीव असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटलांचे पुतणे आहेत. बिबट्याच्या शोधासाठी दोन शार्प शुटर,६ शस्त्रधारी पोलीस,१५० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पथक तैनात होते. महिनाभरापासून बिबट्याने या परिसरात धुमाकूळ घातला होता.बिबट्याला ठार मारण्याचे आदेश आल्यानंतर सर्व यंत्रणा कामाला  लागली होती.अखेर या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले धवलसिंहांनीच बिबट्याचा गेम केला आणि करमाळासह   तालुक्यातील नागरिकांची दहशतीमधून सुटका केली.