शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संजय राऊत यांना किंमत देत नाहीत : निलेश राणे

नाणार प्रकल्प व एमायडिसी राजापूर या दोन्ही प्रकल्पांच्या जमीन घोटाळा प्रकरणी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. जमिन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार कोण करतय रत्नागिरी जिल्ह्यात हे नावासकट उद्या बाहेर काढणार, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत (Loksabha) समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांना किंमत देत नाहीत व नेताही मानत नाहीत. अशी टीका भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. आपल्या ट्विटमधून निलेश राणे ( Nilesh Rane) यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

ट्विटमध्ये नेमकं काय म्हणालेत ?

आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संज्या राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संज्या ९९% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला. अशी टीका करत निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख त्यांच्या ट्विटमध्ये केला आहे.

नाणार प्रकल्प व एमायडिसी राजापूर या दोन्ही प्रकल्पांच्या जमीन घोटाळा प्रकरणी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. जमिन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार कोण करतय रत्नागिरी जिल्ह्यात हे नावासकट उद्या बाहेर काढणार, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान,  सोमवारी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेना हा कनफ्युज पक्ष असल्याची टीका केली होती. त्यांच्या पाठोपाठ आज निलेश राणे यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे.