धक्कादायक प्रकार! पित्याने टॅब घेऊन न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

बीड : कोरोनाचे सावट संपूर्ण जगभर पसरलेले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे काही कारखाने, कंपन्या आणि शाळा सुद्धा बंद आहेत. तसेच कोरोनाच्या संकटापासून दूर

 बीड : कोरोनाचे सावट संपूर्ण जगभर पसरलेले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे काही कारखाने, कंपन्या आणि शाळा सुद्धा बंद आहेत. तसेच कोरोनाच्या संकटापासून दूर राहण्यासाठी राज्य सरकारने शाळा बंद ठेवून, ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पित्याने टॅब घेऊन न दिल्याने, नाराज झालेल्या एका विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याने दहावीची परिक्षा दिली होती. मात्र अद्याप निकाल आलेला नाही. परंतु राज्यभरात पुढील शिक्षणासाठी ऑनलाईन क्लासेस सुरु झाले आहेत. त्यामुळे त्याला टॅबची गरज लागणार होती. परंतु  सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, असं शेतकरी बापाने पोराला सांगितलं होतं. मात्र हट्ट धरलेल्या मुलाने धीर सोडून, थेट गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, याप्रकरणी गेवराई पोलिसांनी घटनास्थळी चाचपणी केली आहे. तसेच या गंभीर प्रकरणाचा गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.