आता हेच बघायचे बाकी होते ; ‘या’ मंदिराच्या बाहेर चक्क कुत्रा देतो भाविकांना आशीर्वाद; व्हिडीओ एकदा पहाच

सध्या एक अजब घटनेचा व्हीडीओ खूपच व्हायरल होत आहे .एका मंदिराच्या बाहेर चक्क कुत्रा भाविकांना आशीर्वाद देतो. अहमगनगर जिल्यातील सिद्धिटेक येथील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला कुत्र्याकडून आशीर्वाद मिळेल

सध्या एक अजब घटनेचा व्हीडीओ खूपच व्हायरल होत आहे .एका मंदिराच्या बाहेर चक्क कुत्रा भाविकांना आशीर्वाद देतो. अहमगनगर जिल्यातील सिद्धिटेक येथील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला कुत्र्याकडून आशीर्वाद मिळेल. या मंदिराच्या बाहेर पडल्यावर एक कुत्रा भाविकांना आशीर्वाद देताना तुम्हाला दिसेल.या मंदिराच्या बाहेर एक कुत्रा रोज बसलेला असतो आणि विशेष म्हणजे हा कुत्रा कोणी पाळलेला नाही तर रस्त्यावरील कुत्रा आहे. भाविक बाहेर आले आणि जाऊन त्यांनी हात जोडले तर तो कुत्रा त्याचे दोन्ही हात वर करुन भाविकांना आशीर्वाद देतो.या घटनेचा व्हिडिओ एक व्यक्तिने शूट करुन सोशल मीडियावर टाकला आहे.कोणाला अशी घटना घडते हे सांगून विश्वास बसणार नाही मात्र हा व्हिडिओ पाहुन तुम्हाला नक्की पटेल की खरच हे घडत आहे.


सिद्धिटेक मधील सिद्धिविनायक मंदीर हे खुप प्रसिद्ध मंदीर आहे.खुप लांबून भाविक या मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. या मंदिरात अष्टविनायकचे मंदिर आहे.त्यामुळे अष्टविनायक यात्रा करणारा भाविक या मंदिरात येतोच.म्हणून नेहमीच या मंदिरात भावकांची गर्दी पहायला मिळते. त्यातीलच अशा एका अरुण लिमडिया या व्यक्तिने कुत्र्याचा व्हिडिओ फेसबुक वर टाकला आहे.