बालमृत्यू रोखण्यासाठी ५ जिल्ह्यांमध्ये होणार मुलांचे लसीकरण, सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास शासनाला मदत करणार

मुंबई:बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्रातील पाच आदिवासी भागातील जिल्हयांमध्ये लसीकरण करण्याचा निर्णय सिद्धीविनाययक गणपती मंदिर न्यास विश्वस्तांनी घेतला आहे.कोरोनाच्या संदर्भात

 मुंबई: बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्रातील पाच आदिवासी भागातील जिल्हयांमध्ये लसीकरण करण्याचा निर्णय सिद्धीविनाययक गणपती मंदिर न्यास विश्वस्तांनी घेतला आहे. कोरोनाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदिवासी बांधवाबाबत  आरोग्य योजनांबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आदिवासी बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून शासन पाऊले उचलत आहे ही बाब निदर्शनास आणली. या सर्व परिस्थितीत शासनाला मदत केली जावी या हेतूने सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. 

पालघर,नंदुरबार,नाशिक, अमरावती ,गडचिरोली या ५ जिल्ह्यातील बालमृत्यू ही समस्या लक्षात घेऊन तातडीने आदिवासी भागातील ० ते १ वर्ष या वयोगटातील मुलांचे लसीकरण करून बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाला मदत करण्याचा निर्णय सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास विश्वस्तांनी घेतला आहे. त्यासाठी १० कोटी रूपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे.  पालघर,नंदुरबार,नाशिक, अमरावती, गडचिरोली या ५ जिल्ह्यातील ० ते १ वयोगटातील अंदाजे १.४१ लक्ष बालकांना पहिल्या टप्प्यात या लसीचे लसीकरण करता येईल. आरोग्य विभागाच्या अभ्यासानूसार, न्युमोकोकल  ही लस बालक ९ महिने पूर्ण होईपर्यंत ३ टप्प्यात द्यावी लागते. पाच जिल्ह्यासाठी अंदाजे ४.६२ लक्ष डोसेसची आवश्यकता भासणार आहे.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार, न्युमोकोकल ही लस ४ डोसेसच्या व्हायलमध्ये उपलब्ध असून प्रति व्हायलची किंमत अंदाजे ८००रूपये इतकी आहे. पाच आदिवासी जिल्ह्यांमध्ये लसीकरण सुरू करण्यासाठी अंदाजे १० कोटी इतक्या निधीची आवश्यकता आहे. त्यानूसार, बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी बालक लसीकरण योजनेसाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय न्यास विश्वस्तानी घेतला असून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाच्या विधी न्याय विभागाकडे पाठवण्यात आला हाेता. याबाबत आता विधी व न्याय विभागाने अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार, आयुक्त, आरोग्य सेवा यांच्याकडे हा निधी लवकरच सुपूर्द करण्यात येईल, असेही सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून सांगण्यात आले आहे.