dr-amol-kolhe-discussing-the-administrative-challenges-after-covid

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी गुगलला 'थँक यु' म्हटले आहे. कोल्हे यांची चुकीच्या वाढदिवसाची नोंद गुगलवर होती. गुगलच्या चुकीमुळे त्यांना रविवारी फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला. हा सविस्तर प्रकार फेसबुक पोस्टद्वारे मांडत त्यांनी गुगलची चूक निदर्शनास आणून दिली. या पोस्टनंतर गुगलने चूक सुधारली आहे. आणि यासाठीच खासदार अमोल कोल्हे यांनी गुगलला 'थँक यु' म्हटले आहे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी गुगलला ‘थँक यु’ म्हटले आहे. कोल्हे यांची चुकीच्या वाढदिवसाची नोंद गुगलवर होती. गुगलच्या चुकीमुळे त्यांना रविवारी फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला. हा सविस्तर प्रकार फेसबुक पोस्टद्वारे मांडत त्यांनी गुगलची चूक निदर्शनास आणून दिली. या पोस्टनंतर गुगलने चूक सुधारली आहे. आणि यासाठीच खासदार अमोल कोल्हे यांनी गुगलला ‘थँक यु’ म्हटले आहे

गुगलच्या सर्चमध्ये अमोल कोल्हे यांचा वाढदिवस १८ ऑक्टोबरला असल्याचा नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे आज सकाळपासून अमोल कोल्हे यांच्यावर चाहते आणि कार्यकत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता. या सगळ्या प्रकारानंतर अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत तारखेबद्दल स्पष्ट केले. यानंतर गुगलच्या चूक लक्षात येताच त्यांनी तारखेत दुरुस्ती केली.

डॉ अमोल कोल्हे यांची फेसबुक पोस्ट-
“Google भाऊ, दोन दोन वाढदिवस पचनी पडत नाही. बरं, तिथी आणि तारीख हाही प्रकार नाही. सहज प्रश्न पडला, माझ्यासारख्या सामान्य मावळ्याची ही परिस्थिती असेल तर वर्षानुवर्षे महाराजांना काय वाटत असेल”“आज सकाळपासून वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. एकाच वर्षात दोनदा हे प्रेम अनुभवायला मिळणाऱ्या मोजक्या जणांपैकी आपण एक असल्याचे हे भाग्य आहेच. वेळात वेळ काढून अनेकजण फोनद्वारे, मेसेजद्वारे, सोशल मिडियातून शुभेच्छा देत आहेत. त्या सर्वांचा ऋणी आहे”, असं अमोल कोल्हेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.

 

गुगलने चूक दुरुस्त केल्यानंतर ‘माझ्या जन्मदिवसाची नोंद बरोबर केल्याबद्दल Thank You Google, असं ट्विट कोल्हे यांनी केलं.