सोलापुरात आज ४८ कोरोनाबाधितांची नोंद – शहर आणि ग्रामीण भागातील ९ पोलिसांचा समावेश ; संख्या पोहोचली २६४ वर

सोलापूर: सोलापुरात कोरोनाचा कहर आणखी मोठ्या प्रमाणावर वाढतच चालला आहे. रविवारी सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील एकूण ४८ रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये शहर आणि ग्रामीण

सोलापूर: सोलापुरात कोरोनाचा कहर आणखी मोठ्या प्रमाणावर वाढतच चालला आहे. रविवारी सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील एकूण ४८ रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये शहर आणि ग्रामीण भागातील ९ पोलिसांचा समावेश आहे. आता सामान्य नागरिकांकडून कोरोना पोलिसांकडे वळल्याने चिंता आणखीनच वाढली आहे. रविवारी २९ पुरुष आणि १९ स्त्रियांचा करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आतापर्यंतचा एकूण आकडा २६४ वर पोहोचला असून यामध्ये १५२ पुरुष आणि ११२ स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापुरात आतापर्यंत शहरातील ३ आणि ग्रामीणमधील १३ अशा एकूण १६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.  

आज एकूण १३२ अहवाल प्राप्त झाले.त्यामध्ये ८४ निगेटिव्ह आणि ४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.१५२ अहवाल प्रलंबित आहेत. रविवारी १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ४१ जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज जे नवे रुग्ण मिळून आले आहेत . त्यामध्ये संजीव नगर एमआयडीसी रोड १,गजानन नगर जुळे सोलापूर १,होटगी रोड बजरंग नगर१, सम्राट चौक  १, मंत्री चंडक पोलीस कॉलनी सम्राट चौक १, रविवार पेठ १,मुरारजी पेठ पोलीस वसाहत १,जुळे सोलापूर समृद्धी हेरिटेज १,निर्मिती टॉवर मोदी खाना १, अश्विनी ग्रामीण हॉस्पिटल कुंभारी १,सिद्धेश्वर पेठ ८, लष्कर सदर बझार ४,लोकसेवा प्रशाला १, शास्त्री नगर ७,बुधवार पेठ मिलिंद नगर १,तेलंगी पाच्छा पेठ १,विडी घरकुल तूळशांती नगर १,सिद्धार्थ चौक १,कुमारस्वामी नगर १,नीलम नगर १,कुमठा नाका हुडको कॉलनी २,मोदी खाना १,गवळी वस्ती जुना कुंभारी रोड १,कुंभारी नाका १,सिव्हिल कोर्टर १,होटगी नाका मुलींचे वसतिगृह १,मजरेवाडी सहारा नगर १,मोदी शिवाजी नगर १, मोहोळ तालुका पाटकूल १,  मोहोळ तालुका ढोक बाभुळगाव १ आणि मोहोळ तालुका सावळेश्वर येथील एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे. आजतागायत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये ६ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत ३१२४ जणांचे स्वॅब घेण्यात आलेले असून २९७२ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये २७०८ अहवाल निगेटिव्ह आणि २६४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.