सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला १४५ वर

सोलापूर : सोलापूर शहरांमध्ये कोरोना रूग्णांची वाटचाल आता दीड शतकाकडे सुरू झाली आहे. मंगळवारी एक पोलीस आणि एका रुग्णालयातील लॅब असिस्टंटसह शहर आणि ग्रामीण भागातील एकूण दहा जणांचे रिपोर्ट कोरोना

 सोलापूर : सोलापूर शहरांमध्ये कोरोना रूग्णांची वाटचाल आता दीड शतकाकडे सुरू झाली आहे. मंगळवारी एक पोलीस आणि एका रुग्णालयातील लॅब असिस्टंटसह शहर आणि ग्रामीण भागातील एकूण दहा जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत . ज्यामध्ये ५ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता १४५ इतकी झाली आहे. मंगळवारी एका ६३ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ९ जणांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला असून मयतामध्ये ४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. 

सोलापूर शहरातील एका नामांकित रुग्णालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या तरुणाची  टेस्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आली आहे. हा तरुण दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावचा रहिवासी आहे. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील चेक पोस्टवर कार्यरत असणाऱ्या ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्याची टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह आली आहे.त्यामुळे वडकबाळ चेक पोस्ट परिसरात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत.
 सोलापूर शहरातील एका खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सिंहगड इन्स्टिट्यूटच्या क्वारंंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. यातील एका लॅब असिस्टंटची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या तरुणाला २८ एप्रिल रोजी सिंहगडच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले होते. या तरुणाचे कुटुंब मोठे असून त्यामुळे कुटुंबातील लोक शेजारी राहणारे यांची तपासणी करण्यात येत आहे. या सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेळेगावचा तीन किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. याठिकाणी निर्जंतुकीकरणासह इतर उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. याशिवाय सोलापूर शहरातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील एकूण ३९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची टेस्ट घेण्यात आली आहे .यातील ३५ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत .एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून हे सुद्धा ५५ वर्षीय पोलीस कर्मचारी असल्याची माहिती देण्यात आली. संबंधित पोलिस कर्मचारी सोलापुरात राहत असून त्यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर – विजापूर महामार्गावरील वडकबाळ चेकपोस्टवर नेमण्यात आले होते. या ठिकाणी त्यांची चहा पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणाऱ्या इतर लोकांची सुद्धा चौकशी करण्यात येत आहे. या सर्व लोकांना तपासणीसाठी सोलापुरात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी जे १० रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यामध्ये शास्त्री नगर,पोलीस मुख्यालय ग्रामीण,सदर बझार लष्कर,राहुल गांधी झोपडपट्टी,विजापूर रोड हुडको कॉलनी,कामाठीपुरा,नीलम नगर एमआयडीसी,एकता नगर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत २४०७ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २१७२ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. २३५ अहवाल प्रलंबित आहेत. २०२७ अहवाल निगेटिव्ह तर १४५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्यापही ११२ जण रुग्णालयात उपचार घेत असून २४ जण बरे होऊन घरी परतले आहेत