शिवसेना आयोजित महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ६०० हून अधिक जणांनी केले रक्तदान

या शिबीरात ६०० हून अधिक जणांनी सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबिरात जे रक्त संकलन करण्यात आले, ज्याचा वापर गरजू रुग्णांसाठी केला जाणार आहे.

पिंपरी: शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना, युवासेनाच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले. या शिबीरात ६०० हून अधिक जणांनी सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबिरात जे रक्त संकलन करण्यात आले, ज्याचा वापर गरजू रुग्णांसाठी केला जाणार आहे.

युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक .सुलभाताई उबाळे, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट व शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. खास करून तरुण वर्गाने आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत सामाजिक कर्तव्याची जाण ठेऊन रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात जे रक्त संकलन करण्यात आले, ज्याचा वापर गरजू रुग्णांसाठी केला जाणार आहे. या शिबीरात ६०० हून अधिक जणांनी सहभाग नोंदविला.