रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली – लालपरीने ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले

मध्य रेल्वेची(Central Railway) वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे बंद पडल्याने हजारो प्रवाशी कसारा, इगतपूरी स्थानकात अडकून पडले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरीता एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बसेस(Buses) उपलब्ध करून दिल्या.

    मुंबई: मुसळधार पावसामुळे(Heavy Rain) कसारा घाटात दरड कोसळल्याने (landslide) मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प (Railway stopped)झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला एसटी धावून आली. कसारा, इगतपूरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने(ST Buses Passengers) गुरुवारी पहाटे ४ वाजता तातडीने १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ॲड. अनिल परब यांनी दिली.

    मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प् झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे बंद पडल्याने हजारो प्रवाशी कसारा, इगतपूरी स्थानकात अडकून पडले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरीता एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बसेस उपलब्ध करून दिल्या. सदर वाहतुक गुरुवारी पहाटे ४ वाजल्यापासून सुरु करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे ५८०० हून अधिक प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आले. त्यामुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

    पुणे-मुंबई मार्गावर ७४ जादा गाड्या सोडल्या

    पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरीता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा सोडल्या. तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली.