राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २० हजार पार – ११६५ नवे रुग्ण तर ४८ जणांचा मृत्यू

मुंबई :राज्यात आज ११६५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०,२२८ झाली आहे.तर ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.तसेच ३३० रुग्ण बरे होऊन घरी

 मुंबई  : राज्यात आज ११६५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०,२२८ झाली आहे. तर ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३३० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने आजपर्यंत ३८०० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.  राज्यामध्ये रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून सलग चौथ्या दिवशी हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडले असून आज राज्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णांनी २० हजारचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी ११६५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २०,२२८ झाली आहे. यामध्ये मुंबईतील ७७२ रुग्ण असून मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ६८९ वर पोहोचली आहे. राज्यात शनिवारी ४८ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ७७९ वर पोहचली आहे. मृतांमध्ये मुंबईमधील २७, पुण्यातील ९ , मालेगाव शहरात ८, पुणे जिल्ह्यात १, अकोला शहरात १, नांदेड शहरात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. यामध्ये २१ पुरुष तर २७ महिला आहेत. ४८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर १८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणा-या इतर आजारांबाबत ९ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३९ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये ( ७२ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता झाली आहे. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,२७,८०४ नमुन्यांपैकी २,०६,४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २०,२२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १२४३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२,३८८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात २,४१,२९० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३,९७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.