राज्यात १५७६ नवे रुग्ण तर ४९ जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांची संख्या २९ हजार १००

मुंबई :राज्यात शुक्रवारी १५७६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोना बाधितांची संख्या २९ हजार १०० झाली आहे. तर ४९ जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १०६८ वर पोहचली आहे. शुक्रवारी ५०५ रुग्ण बरे

मुंबई : राज्यात शुक्रवारी १५७६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोना बाधितांची संख्या २९ हजार १०० झाली आहे. तर ४९ जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १०६८ वर पोहचली आहे. शुक्रवारी ५०५ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत ६५६४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात ४९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये मुंबईमधील ३४, पुण्यात ६, अकोला २, कल्याण डोंबिवली २, धुळयात २, पनवेल १, जळगाव १ तर औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.
 
मृतांमध्ये २९ पुरुष तर २० महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २२ रुग्ण आहेत तर २३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये ( ६५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ पोर्टलनुसार राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग ११ दिवस इतका आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,५०,४३६ नमुन्यांपैकी २,२१,३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९,१०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १४७३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,१६७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५८.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ३,२९,३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १६,३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.