राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार पार – ८४१ नवे रुग्ण, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई :राज्यात ८४१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५,५२५ झाली आहे. तसेच राज्यात ३४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६१७ झाली आहे. तर ३५४ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई : राज्यात ८४१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५,५२५ झाली आहे. तसेच राज्यात ३४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६१७ झाली आहे. तर ३५४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात ३४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात मुंबईमधील सर्वाधिक २६, पुण्यातील ६, औरंगाबाद शहरात १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. 

मृतांमध्ये २४ पुरुष तर १० महिला आहेत. तसेच ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये ( ८२ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात आजपर्यंत २८१९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,८२,८८४ नमुन्यांपैकी १,६७,२०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५,५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ९४३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११,६२९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५०.८१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  सध्या राज्यात १,९९,१८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२,४५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.